Sanjy Raut : मुख्यमंत्री फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : संजय राऊत यांनी आज ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटतं की ते मदारी आहेत आणि ते सर्वांना नाचवू शकतात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी आज केली आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी फडणवीस – राज ठाकरेंच्या भेटीवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. त्यांच्या हातात सत्ता आहे, उद्योजकांची लॉबी आहे, म्हणून हे सगळं तात्पुरतं आहे, असंही राऊत यांनी म्हंटलं.
यावली पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याने त्यावर पुन्हा एकदा पूर्णविराम लागल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या युतीबाबत नेमके काय होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
