खातं बदलून गुन्हा माफ होईल का? संजय राऊतांचा घणाघाती सवाल

खातं बदलून गुन्हा माफ होईल का? संजय राऊतांचा घणाघाती सवाल

| Updated on: Jul 25, 2025 | 11:54 AM

खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करताना म्हटले की, त्यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा सरकारला त्यांना मंत्रिमंडळातून काढावे लागेल. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचा अपमान केला, तो केवळ खाते बदलून मिटणार आहे का? मंत्रिपद बदलले तरी त्यांचा गुन्हा माफ होईल का? अजित पवार यांना हे मान्य आहे का? स्वत:ला शेतकऱ्यांचा नेता समजणारे अजित पवार संजय शिरसाट, संजय राठोड आणि कोकाटे यांच्यासारखे लोक मंत्रिमंडळात घेऊन राज्य कसे चालवतात? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

पुढे राऊत म्हणाले, हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने सरकारला काहीच फरक पडत नाही. ठेकेदार होता की नाही याचे संशोधन करून तुम्ही आमच्यासमोर माहिती आणता, पण त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट आहे, तरीही सरकारला त्याची पर्वा नाही. हा गुलाबराव पाटील यांच्या खात्यातील घोटाळा आहे. आतापर्यंत अनेक ठेकेदार रस्त्यावर आले, काहींनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. जळगावमध्ये तर मुख्यमंत्र्यांच्या कारसमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाला. तरीही गुलाबराव पाटील काय सांगतात? हे सगळे लोक रावणासारखे आहेत.

Published on: Jul 25, 2025 11:54 AM