Sanjay Raut : बेडकासारख्या उड्या मारत आलेले आम्हाला शिकवणार का?
Sanjay Raut Critics Shambhuraj Desai : खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शंभुराज देसाई यांच्यावर टीका केली आहे.
कॉंग्रेस पक्षातून शिवसेनेत बेडकासारख्या उड्या मारत आलेले शंभूराज देसाई आता आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे त्यांच्याबद्दल शिकवणार का? असा खोचक प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना उबाठा गटाच्या शिबिरात बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजंटली क्लिप ऐकवून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. त्यावरून सत्ताधारी पक्षाकडून उबाठा गटावर टीका केली जात आहे. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून त्यावरून सत्ताधाऱ्यांना खणखणीत उत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही जर अमित शहा यांच्यावर काही बोललो असतो तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बोलायला हवे होते. कारण ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तर त्यांची तक्रार योग्य म्हटली गेली असती. शंभुराज देसाई यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सर्वांना सांगितले आहे की देवेंद्र फडणवीसांची चाकरी करा नाही तर बाजूला व्हा. सरकार तुमच्याशिवाय चालेल. त्यामुळे खातेपिते घरं सोडून कसे जातील, अशी खोचक टीका देखील यावेळी राऊतांनी केली.
