Sanjay Raut : …आमचं मोदींसारखं नाही, हिंदी भाषा सक्तीवरून संजय राऊतांचा पंतप्रधानांना खोचक टोला
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे. तर हिंदीऐवजी इतर भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थी असणं अनिवार्य असणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून हा नवा जीआर काढण्यात आला आहे
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून तसा नवा जीआर काढण्यात आला आहे. मात्र शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती नको असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. हे राष्ट्रीय धोरण आहे. आम्ही संसदेत जाऊन यासंदर्भात मोदींनी प्रश्न विचारू…आमच्यासह इतर अनेक खासदार असतील आम्ही त्याच्यावर चर्चा करू. राष्ट्रीय शैक्षणिक जे धोरण ठरवलं जातंय ते भाजपच्या राजकीय सोयीसाठी ठरवतंय, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय.
हिंदी भाषा आम्हाला चांगली येते, ती शिकवण्याची आम्हाला गरज नाही. तर नरेंद्र मोदींपेक्षा मुंबईत हिंदी आम्ही उत्तम बोलतोय. मुंबईत मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक आहे. आमचा हिंदीला कधीच विरोध नाही पण शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करू नका, असं संजय राऊत म्हणाले. संसदेत आमचा पूर्ण व्यवहात हिंदीतून चालतो. कारण हिंदी देशाची भाषा आहे. आमचं मोदींसारखं नाही सायप्रसला जाऊन हिंदीत बोलायचं आम्ही तिथं जाऊन इंग्रजीत बोलतो, असं म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला.
