Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो आता नो टेन्शन… 1500 रू. वेळेवर जमा होणार, कारण 410 कोटी…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो आता नो टेन्शन… 1500 रू. वेळेवर जमा होणार, कारण 410 कोटी…

| Updated on: Aug 01, 2025 | 2:44 PM

सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आलेत. जुलै महिन्याचा निधी वर्ग केल्याची माहिती आहे. तर दोन दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्यानं याआधीच मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. खातं बंद करा अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहिणीसाठी वर्ग करण्यात आलाय. शिरसाट यांच्या खात्यातील 410 कोटी रुपये वळवण्यात आलेत. जुलै महिन्याचा निधी वर्ग केल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी खात्यासंदर्भातील निधीचा विषय अजित दादांच्या कानावर घातल्याची माहिती आहे.

दरम्यान,  10 कोटीचा लाडक्या बहिणींचा निधी आता पुन्हा वळवण्यात आलाय. त्याबद्दल संजय शिरसाट यांना सवाल केला असता, ते म्हणाले, आता हे रुटीन आहे ते दर महिन्याला मी 410 कोटी रुपये माझ्या खात्यातर्फे देत असतो. आता कोणतीही नाराजी नाही. अशातच गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रूपये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांची आहे.

Published on: Aug 01, 2025 02:36 PM