‘संजय राऊत आदित्य ठाकरे यांना चावले की काय?’, शिवसेना नेत्याचा खोचक सवाल
VIDEO | 'दिल्लीतून सैन्य बोलवा किंवा तुम्ही कितीही आव्हानं द्या आम्हाला काहीच फरक पडत नाही. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे', ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या निर्धावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी पलटवार करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | संजय राऊत हे आदित्य ठाकरे यांना चावले की काय? त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य देखील बेताल असल्याच म्हणत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. ‘आमचा मेळावा शिवतीर्थावरच होणार लष्कर (आर्मी) बोलावले तरी चालेल’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, राऊतांचं हे वक्तव्य अर्थहिन आहे. शिवतीर्थवर मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून दोन्ही गटांनी अर्ज केलाय. ज्यांना परवानगी मिळेल तो मेळावा घेईल. मराठी माणसाला न्याय देण्यासाठी त्या मैदानावर भूमिका घेतली. त्याच मैदानावर सिल्वर ओकच्या दावणीला बांधलेले काय मेळावा घेणार, असे म्हणत संजय शिरसाट यांनी सवाल उपस्थित केला आहे. आमचा मेळाव्यात शिवाजीपार्कचं मैदान हे शिवसैनिकांनी जर फुललं, त्यांची गर्दी पाहिली त्यांनी पाहिली तर त्यांची दुकान बंद होतील म्हणून ते बोलताय, असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला.
