Sanjay Shirsat : नेमका कोणता वाघ अडचणीत हे समजलं पाहिजे; संजय शिरसाट यांची टीका
Sanjay Shirsat Slams MNS : मनसेकडून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओवर संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी टीका केली आहे.
नेमका कोणता वाघ अडचणीत आहेत, हे समजलं पाहिजे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. मनसे सचिव सचिन मोर यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर संजय शिरसाट यांनी ही टीका केली आहे. 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून मनसेकडून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. दोन लढवय्या भावांची गोष्ट बघायला या, असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. त्यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या प्रकारे सगळं दाखवलं जात आहे, त्यावरून दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचं चित्र तयार केलं जात आहे. मात्र त्यावर अद्यापही राज ठाकरेंकडून कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असं शिरसाट यांनी म्हंटलं आहे. तर टिझर दाखवून मत मिळत नसतात, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
Published on: Jul 03, 2025 04:14 PM
