Sanjay Shirsat : तो खूप चांगला माणूस आहे, आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आज चंद्रकांत खैरे यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिलेली आहे. पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांचं कौतुक केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहे.
चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल मला कधीही राग नाही. त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे आहेत, असं संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मोठं विधान केलं आहे.
यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, आम्ही खैरेंना अधिकृत ऑफर दिलेली होती. त्यांच्यासाठी आमचे दार उघडे आहेत. बाकीच्यांना नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो आहे. हिंदुत्वाची कास आम्ही धरली आहे. हे त्यांनी मान्य केलं आहे. म्हणून त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैरेंवर राग नाही. खैरेंना अडचणीत टाकलं गेलं आहे. म्हणून मातोश्री सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे, असंही संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.
Published on: Apr 06, 2025 02:17 PM
