संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला, 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सुरेंद्रकुमार आकोडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. बांगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आलाय. हल्ला केलेल्या शिवसैनिकांचा पोलीस सोध घेत आहेत. संतोष बांगर यांच्या वाहनावर अमरावतीच्या (Amaravati) अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसौनिकांकडून हल्ला करण्यात आला होता . संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचावर फोडण्यात आल्या. पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी दंगा विरोधी कायदा आणि सुमोटो कारवाई करत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी दिली आहे.
Published on: Sep 26, 2022 09:37 AM
