Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार

| Updated on: Mar 19, 2025 | 6:20 PM

Beed Court : संतोष देशमुख हत्या प्रकानरणाचा पुढील खटला बीड सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे. यपूर्वीची पहिली सुनावणी ही केज सत्र न्यायालयात पार पडली होती.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड सत्र न्यायालयात चालणार आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी केज न्यायालयात झाली होती. आता पुढचा खटला हा बीड सत्र न्यायालयात चालणार आहे.

संतोष देशमुख यांची 3 महिन्यांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलेला होता. तपासात 8 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून त्यातील 7 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. सर्व आरोपींवर मकोका दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड समजला जाणारा वाल्मिक कराड हा आरोपी आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. वाल्मिक कराड आरोपी ठरल्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. आता हे प्रकरण न्यायालयात वर्ग असून त्यावर सुनावणी सुरू आहे.

Published on: Mar 19, 2025 06:20 PM