Walmik karad : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराड मकोकातून सुटणार? उज्ज्वल निकम यांची मोठी माहिती
Santosh Deshmukh Case Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समजला जाणार वाल्मिक कराड याच्यावर लावण्यात आलेला मकोका आता हटणार असल्याची शक्यता आहे. त्याबद्दल उज्ज्वल निकम यांनी मोठी माहिती दिली आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. तब्बल 50 मिनिटं ही सुनावणी सुरू होती. तर आता पुढची सुनावणी 17 जून रोजी पार पडणार आहे. मकोका विशेष न्यायालयात आज ही सुनावणी पार पडली. यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, वाल्मिक कराड याने आपल्याला मकोकामधून दोषमुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केलेला आहे. त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल. वाल्मीक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेले आहेत. आम्ही कोर्टाला असे प्रस्तावित केले आहे की याबाबतचा निर्णय एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा. यावर न्यायालयाने आणि बचाव पक्षाच्या वकिलांची हरकत असल्याने बचाव पक्षाकडून असे सांगण्यात आले की प्रथम त्याला मकोकामधून मुक्त करावे. या अर्जावर चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असे म्हटले. त्यामुळे आता वाल्मीक कराडला मकोकाच्या तरतुदी लागू होतात की नाही यावर 17 तारखेनंतर युक्तिवाद होतील, असं निकम यांनी सांगितलं आहे. तर 17 तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होते त्यावर युक्तिवाद आणि न्यायालयाकडून निर्णय येईल. 17 तारीख ही अर्जाच्या चौकशीसाठी असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही. परंतु ज्या-ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे. आणि तसेच माझे सहकारी अॅड. कोल्हे सरकारतर्फे 17 तारखेला बाजू मांडतील, अशी माहिती उज्ज्वल निमक यांनी दिली.
