Video | हेच ते मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य, ज्यात शिवरायांच्या शौर्याची उपमा एकनाथ शिंदे यांच्या बंडाला देण्यात आली..

Video | हेच ते मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य, ज्यात शिवरायांच्या शौर्याची उपमा एकनाथ शिंदे यांच्या बंडाला देण्यात आली..

| Edited By: | Updated on: Nov 30, 2022 | 1:40 PM

एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. शिंदेही बाहेर आले. त्यामुळेच हा उत्साह आहे.. असं वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलं. त्यावरून आता राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.

साताराः केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. साताऱ्यात प्रतापगडावर आज शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी हिंदीतून भाषण करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले, शिवाजी महाराजांना त्या काळी औरंगजेबाने आग्रा किल्ल्यावर पकडून नेलं होतं. तिथे डांबण्यात आलं होतं. शिवाजी महाराज यांनी स्वतःसाठी नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी तेथून सुटका करून घेतली. अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. शिंदेही बाहेर आले. त्यामुळेच हा उत्साह आहे.. असं वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलं. त्यावरून आता राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.

Published on: Nov 30, 2022 01:40 PM