Phaltan Doctor Death : त्यांचं रिलेशन…महिला डॉक्टरनं भावाला प्रपोज केलं अन्… आरोपी बनकरच्या बहिणीच्या डोकं चक्रावणाऱ्या खुलाशाने खळबळ!
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने धक्कादायक माहिती दिली आहे. तिच्या मते, डॉक्टरने प्रशांतला प्रपोज केले होते, पण त्याने नाकारले. डॉक्टर नेहमी तणावात असायच्या, असेही बहिणीने सांगितले. प्रशांतला ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल.
साताऱ्यातील फलटण येथे घडलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली असून, आज त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, संबंधित डॉक्टरनेच प्रशांतला प्रपोज केले होते, परंतु प्रशांतने ते नाकारले होते. “डॉक्टर मॅडम नेहमी तणावात असायच्या,” असेही बहिणीने सांगितले. प्रशांतने स्वतः फलटणमधील घरी आत्मसमर्पण केले असल्याचेही तिने स्पष्ट केले. या घटनेच्या सखोल तपासाची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.
Published on: Oct 25, 2025 03:00 PM
