AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phaltan Doctor Death  : आमचा मुलगा तसा नाहीच.. हातावर नाव त्या मुलीनं नाही लिहिलं, ते... आरोपी बनकरच्या आई-वडिलांची मागणी काय?

Phaltan Doctor Death : आमचा मुलगा तसा नाहीच.. हातावर नाव त्या मुलीनं नाही लिहिलं, ते… आरोपी बनकरच्या आई-वडिलांची मागणी काय?

| Updated on: Oct 27, 2025 | 1:24 PM
Share

फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सातारा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून, बनकरला मानसिक त्रासाचा आरोप आहे. दुसरा आरोपी, निलंबित पीएसआय गोपाल बदने, अजूनही फरार आहे. दरम्यान, बनकरच्या पालकांनी आपल्या मुलावर अन्याय झाल्याचा आरोप करत, मृत डॉक्टरच्या हातावर नाव कोणी लिहिले याची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सातारा ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून, प्रशांत बनकरला सध्या फलटण शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मृत महिला डॉक्टरला बनकरने मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. प्रशांत बनकर मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी पहाटे चार वाजता त्याला ताब्यात घेतले.

मात्र, या प्रकरणातील दुसरा आरोपी, निलंबित पीएसआय गोपाल बदने, अद्यापही फरार आहे. त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, तपास त्या दिशेने वळवला जात आहे. प्रशांत बनकरच्या आई-वडिलांनी आपल्या मुलावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरच्या हातावर नाव कोणी लिहिले, तिने स्वतः की कोणी मुद्दाम लिहिले, याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे.

Published on: Oct 25, 2025 11:48 AM