Video : “बाबा, या आनंदाच्या क्षणी बाबा तुम्ही हवे होता”, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच सायली संजीव भावूक

| Updated on: Jul 23, 2022 | 11:47 AM

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य… आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच यंदाच्या मनाच्या समजल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ”गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाने पटकावला आहे . प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने […]

Follow us on

सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य… आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच यंदाच्या मनाच्या समजल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ”गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाने पटकावला आहे . प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने  या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्यावर “बाबा मला तुमची आठवण येतेय. या आनंदाच्या क्षणी बाबा तुम्ही हवे होता”, अश्या भावना सायली संजीवने व्यक्त केल्या.