Jalgaon | एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास

Jalgaon | एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास

| Updated on: Jan 22, 2026 | 6:06 PM

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील वावडे गावात अज्ञात चोरट्यांनी सलग सात घरांवर दरोडा टाकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दरोड्यात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या–चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील वावडे गावात अज्ञात चोरट्यांनी सलग सात घरांवर दरोडा टाकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दरोड्यात चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या–चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान योगेश पाटील यांच्या घरात देखील चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत कपाटे फोडून चोरी केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून  तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. चोरी करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे. या घटनेमुळे वावडे गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Published on: Jan 22, 2026 06:06 PM