Vasant More : शनिवारवाड्यावर 24 तास पोलीस बंदोबस्त, वसंत मोरेंची भाजपवर टीका; निवडणुकीवेळी भाजपचं पार्टटाईम हिंदुत्व जागं….

Vasant More : शनिवारवाड्यावर 24 तास पोलीस बंदोबस्त, वसंत मोरेंची भाजपवर टीका; निवडणुकीवेळी भाजपचं पार्टटाईम हिंदुत्व जागं….

| Updated on: Oct 21, 2025 | 9:51 PM

शनिवारवाड्यावर नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या, ज्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. खासदार मेधा कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर सुषमा अंधारेंनी चौकशीची मागणी केली. यावर वसंत मोरेंनी भाजपवर निवडणुकीच्या वेळी पार्टटाईम हिंदुत्व जागं होत असल्याची टीका केली.

पुण्यातील शनिवारवाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शनिवारवाड्यात नमाज पठणाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनात खासदार मेधा कुलकर्णी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची त्यांची मागणी होती. या घटनेनंतर पोलिसांनी शनिवारवाड्यावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

मेधा कुलकर्णींच्या आंदोलनावर सुषमा अंधारेंनी टीका केली असून, त्यांच्या गोंगाटाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वसंत मोरे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की भाजपचे पार्टटाईम हिंदुत्व जागे होते. त्यांनी २०१७ मधील घटनेचा संदर्भ देत, तेव्हा १०० भाजप नगरसेवकांच्या मिरवणुकीवेळी हा दर्गा त्यांना दिसला नव्हता का, असा सवाल केला. वसंत मोरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या अधिकारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Published on: Oct 21, 2025 09:51 PM