जॉनी जॉनी, येस पापा… ईटिंग खोके? खोके अन् ईडीचा उल्लेख करत पवार गटानं भाजपला डिवचलं
खोके आणि ईडी उल्लेख करत शरद पवार गटाने भाजवर निशाणा साधला आहे. शरद पवार गटाकडून भाजपला डिवचणारं ट्वीट करण्यात आलं आहे. Nationalist Congress Party -Sharadchandra Pawar अशा नावाच्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून शरद पवार गटाने भाजपला डिवचलं आहे. खोके आणि ईडी उल्लेख करत शरद पवार गटाने भाजवर निशाणा साधला आहे. शरद पवार गटाकडून भाजपला डिवचणारं ट्वीट करण्यात आलं आहे. Nationalist Congress Party -Sharadchandra Pawar अशा नावाच्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले की, जॉनी जॉनी, येस पापा…ईटिंग खोके? नो पापा…लिविंग पार्टी? नो पापा….अफ्रेड ऑफ ईडी नो पापा….टेलिंग लाई, नो पापा….ओपन युवर माऊथ भाजपा…..अशा शब्दात भाजपला टोला लगावला आहे. तर बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! असं खोचक कॅप्शन देत शरद पवार गटाकडून ट्वीट करण्यात आलंय.
