Rohit Pawar Video : ‘… हे जगजाहीर आहे’, रोहित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन
रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलंय. रोहित पवारांनी आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केल्याचं म्हणत एक ट्वीट केलंय.
शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलंय. रोहित पवारांनी आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केल्याचं म्हणत एक ट्वीट केलंय. ‘मागील सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या काही खेकड्यांनी आरोग्य खात्याचा उपयोग लोकांना आरोग्य सेवा देण्याऐवजी केवळ दलालीचा मेवा खाण्यासाठीच केला, हे जगजाहीर आहे. याचाच भाग म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं 70 कोटी रुपयात होणारं काम यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी 3200 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं. याच कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन’, असं रोहित पवार यांनी म्हटलंय तर अशाच प्रकारे अँब्युलन्स खरेदीत झालेल्या घोटाळ्याची पाळेमुळेही खणून काढावीत आणि ‘भ्रष्टाचाराच्या खेकड्या’ने खाल्लेली दलाली व्याजासह वसूल करावी, अशी विनंतीही रोहित पवारांनी केली. सोबतच मागील सरकारमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची फाईल जोडत आहे, याचीही सखोल चौकशी करून राज्याची तिजोरी कुरतडणाऱ्यांना अद्दल घडवली तर पुन्हा नांगी वर करण्याची त्यांची हिम्मत होणार नसल्याचेही रोहित पवारांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय.
