Shivraj Bangar : माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायचं होतं अन्… शरद पवारांच्या नेत्याचा खळबळजनक दावा
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांनी एक मोठा दावा करत बीडच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. बघा काय केला गंभीर आरोप?
सरपंच बापू आंधळेचा खून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून झाला, असं म्हणत शिवराज बांगर यांनी गंभीर आरोप केला आहे. तर वाल्मिक कराड हा फक्त प्यादा, त्याच्या मागे माजी मंत्री धनंजय मुंडे याची ताकद असल्याचा मोठा दावा शिवराज बांगर यांनी केलाय. शिवराज बांगर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. माझे हात पाय तोडताना वाल्मिक कराडला लाईव्ह पाहायचं होतं, असा खळबळजनक दावा देखील शिवराज बांगर यांनी केला आहे. ‘ज्या प्रमाणे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करताना वाल्मिक कराडने लाईव्ह पाहिलं त्याच पद्धतीने माझे हात पाय तोडताना त्याला मला लाईव्ह पाहायचं होतं. त्यासाठी वाल्मिक कराडने अनेक जणांना सांगितलं होतं’, असा मोठा दावा करत शिवराज बांगर यांनी एकच खळबळ उडवून दिली.
वाल्मिक कराड हा फक्त प्यादा आहे. तो काहीही करू शकत नाही तर वाल्मिक कराडच्या मागे जी धनंजय मुंडेंची ताकद होती त्या ताकदीने हे सर्व करून घेतलंय. त्यामुळे मुंडे आज असं म्हणू शकत नाही की माझी काही चूक नाही. प्रत्येक चूक आणि गुन्हा तुमचाच असल्याचे म्हणत बांगर यांनी मुंडेंवरच गंभीर आरोप केलाय.
