Sharad Pawar : विधानसभेवेळी ‘ते’ दोघे आले अन् गॅरंटी देत होते की… शरद पवारांच्या गौप्यस्फोटानं खळबळ, ‘त्या’ 2 व्यक्ती कोण?

Sharad Pawar : विधानसभेवेळी ‘ते’ दोघे आले अन् गॅरंटी देत होते की… शरद पवारांच्या गौप्यस्फोटानं खळबळ, ‘त्या’ 2 व्यक्ती कोण?

| Updated on: Aug 09, 2025 | 3:12 PM

शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती नेमक्या कोण होत्या? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दोन माणसांनी पवारांना आणि राहुल गांधी यांना नेमकी काय ऑफर दिली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या दोन दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरींचा गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. मत चोरी कशा पद्धतीने करण्यात आली याचे पुरावे देत राहुल गांधींनी दिल्लीत एक प्रेझेंटशन देखील दिलं. यामध्ये त्यांनी मतं चोरीचा दाखला देत पुराव्यासह पोलखोल केली. मत चोरीच्या आरोपानंतर आता शरद पवारांनी यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’, असं वक्तव्य करत शरद पवारांनी राज्याच्या नाहीतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

Published on: Aug 09, 2025 03:12 PM