उद्या उद्धव ठाकरे रडतील सुद्धा कारण…, शिंदे गटातील नेत्याचा खोचक टोला

उद्या उद्धव ठाकरे रडतील सुद्धा कारण…, शिंदे गटातील नेत्याचा खोचक टोला

| Updated on: Feb 20, 2023 | 6:09 PM

VIDEO | संजय राऊत यांचं ऐकल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर ही वेळ आली, शिंदे गटातील नेत्यानं केला उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

पुणे : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले तेव्हा जसा प्रसंग उभा राहिला होता, तसा प्रसंग आज उभा राहिला आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे केवळ आता भावनिक राजकारण करणार असून लोकांच्या भावनांशी खेळणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली. तर संजय राऊत यांचं ऐकून उद्धव ठाकरे यांनी मोठी चूक केली. संजय राऊतांच ऐकून त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वळचणीला नेऊन बांधली, असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला आहे.

Published on: Feb 20, 2023 06:09 PM