Sanjay Gaikwad : शिंदेंच्या आमदाराची मग्रुरी कायम, शहाणपणा शिकवण्याची गरज नाही… संजय गायकवाडांनी कोणाला फटकारलं?
'चुकीच्या मार्गाने जाण्याची वेळ आमच्यावर कोणी आणू नये. गायकवाड कसे आहेत. आमच्या सर्व लोकांना माहिती आहे. मुंबईतील लोकांनी मला सांगायची गरज नाही.', असं म्हणत गायकवाडांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कँटीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्याने ते भडकले आणि कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर विधानसभेत याप्रकरणी मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि विरोधकांनी गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. घटनेमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. अशातच आज पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. विरोधकांच्या टीकेवर बोलताना संजय गायकवाड यांनी विरोधकांनी मला शहाणपणा शिकवण्याची गरज नसल्याचे म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, ‘ आता आमदार निवासचं कँटीन एका मराठी माणसाला देण्यात आलं पाहिजे. जेणेकरून त्याला मराठी लोकांचं जेवण कसं असतं याची माहिती असेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी दूर करणार आहे. ‘
