बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं… मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा
हिंदू -मुसलमान वाद घालणं आणि पैशाचे वाटप करणं याशिवाय शिंदे सेना- भाजप निवडणुका कधीच जिंकू शकत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आहे. 'सत्तेचा गैरवापर आणि पैशाचे वारेमाप वाटप याशिवाय निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांकडे कोणतीही मोठी ताकद दिसत नाही.
हिंदू -मुसलमान वाद घालणं आणि पैशाचे वाटप करणं याशिवाय शिंदे सेना- भाजप निवडणुका कधीच जिंकू शकत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आहे. ‘सत्तेचा गैरवापर आणि पैशाचे वारेमाप वाटप याशिवाय निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांकडे कोणतीही मोठी ताकद दिसत नाही. म्हणून आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी जर अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची जी संस्था आहे ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल, असंही राऊत म्हणाले. बदडण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकतं, कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असं वक्तव्य करत शिंदे सेना आणि भाजपला राऊतांनी चांगलंच डिवचलं आहे.
Published on: Jan 14, 2026 11:04 AM
