shiv sangram Vinayak mete passed away: “आमचे विचारप्रवाह वेगळे होते पण मैत्री कायम होती”, रावसाहेब दानवेंनी व्यक्त केली हळहळ

| Updated on: Aug 14, 2022 | 8:39 AM

ते 52 वर्षांचे होते. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातीये. भाजप नेते रावसाहेब दानवे काय म्हणालेत बघुयात...

Follow us on

विनायक मेटे (Vinayak Mete) म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाल्यानं त्यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai Pune Express Way) झालेल्या भीषण अपघातात विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते 52 वर्षांचे होते. या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या विनायक मेटे यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातीये. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) काय म्हणालेत बघुयात…