ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प; काय मिळणार ठाणेकरांना?

| Updated on: Mar 21, 2023 | 9:36 AM

आयुक्त अभिजीत बांगर हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे

Follow us on

ठाणे : शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्पही पार पडला. त्यानंतर आता त्यांच्या ठाणे महापालिकेचा 2023-2024 चा आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पार पडणार आहे. आयुक्त अभिजीत बांगर हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर या अर्थसंकल्पातून ठाणेकरांना काय मिळणार याकडे ठाणेवासियांचे लक्ष लागले आहे. तर आयुक्त अभिजीत बांगर ठाणे महापालिकेतील त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचीही छाप अर्थसंकल्पावर दिसण्याची शक्यता आहे.