Ramdas Kadam Video : ‘मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल’, शिंदेंचं कौतुक करत रामदास कदम भरसभेत कडाडले

Ramdas Kadam Video : ‘मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल’, शिंदेंचं कौतुक करत रामदास कदम भरसभेत कडाडले

| Updated on: Feb 15, 2025 | 4:24 PM

उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला. जे शिवसेना प्रमुखांनी इतके वर्ष कमावलं होतं. ते तुम्ही मुख्यमंत्रीपद घेऊन सगळं गमावलं असल्याची सडकून टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं. इतकंच नाहीतर त्यांच्या पाठित खंजीर देखील खुपसलं.’, असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरादर हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले नसते. पण नारायण राणे, मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील आणि झोपडपट्टीतून वर आलेल्याला रामदास कदमला शिवसेनेचा नेता केला, असं म्हणत उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला. जे शिवसेना प्रमुखांनी इतके वर्ष कमावलं होतं. ते तुम्ही मुख्यमंत्रीपद घेऊन सगळं गमावलं असल्याची सडकून टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना कधीच फुटली नसती, असा दावाही रामदास कदम यांनी भर जाहीर सभेत केला. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरीत आभार सभा होत आहे. रत्नागिरीच्या चंपक मैदानातील सभेत बोलताना रामदास कदमांनी घणाघात केला.

Published on: Feb 15, 2025 04:24 PM