Sharad Pawar यांच्या घराबाहेर घडलेला प्रकार दुर्दैवी : Sanjay Raut
संजय राऊत, शिवसेना नेते
Image Credit source: tv9

Sharad Pawar यांच्या घराबाहेर घडलेला प्रकार दुर्दैवी : Sanjay Raut

| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 7:48 PM

एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व उपाय केले आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. तरीही कोणती तरी अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवण्याचं, बिघडवण्याचं काम करत आहे. एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन, डोके भडकावून अशी कृत्य घडावीत यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर आज एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन (ST Andolan) केलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेचेही धाबे दणादणले. या आंदोलनात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करतानाच चप्पल भिरकावण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व उपाय केले आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. तरीही कोणती तरी अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवण्याचं, बिघडवण्याचं काम करत आहे. एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन, डोके भडकावून अशी कृत्य घडावीत यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी (sanjay raut) कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र भाजपकडे असल्याचं सांगितलं जात आहे.