… म्हणून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, संजय शिरसाट यांनी थेट कारणच सांगितलं

| Updated on: May 24, 2023 | 3:35 PM

VIDEO | अनिल देशमुख यांच्या तुरुंगातील ऑफरच्या भाष्यावर संजय शिरसाट म्हणाले....

Follow us on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. अनेकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केली आहे. जे इच्छूक आहेत, ते मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा असं वारंवार सांगत आहेत. अशातच शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्यकरून एकच खळबळ उडवून दिली आहे. मत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तारासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होतं आहे. याबाबत त्यांच्या अंतर्गत काय चालू आहे हे मला माहीत नाही. आमदाराच काय विस्तार व्हावा ही सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. यासह तडजोडीसाठी मला तुरुंगात ऑफर आली होती. ती स्वीकारली असती तर माझ्याविरोधात कारवाई झाली नसती, असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख यांनी त्याच वेळी शर पवारांना सांगायला हवं होतं. आता का बोलता? हा सायको प्रकार आहे. विनाकारण भाजपवर खापर फोडत आहेत, असं ते म्हणाले.