Sanjay Raut | कुणाला तरी कुर्बान व्हावं लागेलच.. मी बोलणारच.. – संजय राऊत
महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Navab Malik) यांची आज सकाळपासूनच ईडीने चौकशी सुरु केली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Navab Malik) यांची आज सकाळपासूनच ईडीने चौकशी सुरु केली आहे. मलिक यांच्या घरी ईडीचे आज सकाळी 23 फेब्रुवारी रोजी ईडीचे (ED Enquiry) लोक आले आणि त्यांना चौकशीसाठी घेऊन गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि केंद्र सरकारविरोधात सातत्याने आगपाखड केल्यानेच नवाब मलिक यांच्या पाठीशी आता ईडी लागली आहे, असा आरोप केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील याविषयी प्रतिक्रिया दिली. केंद्रीय तपास यंत्रणा या केवळ महाविकास आघाडी आणि भाजपविरोधी पक्षांसाठीच बनलेल्या आहेत का? असा सवाल यांनी केला. या सगळ्याचा मी जाब विचारणार असून देशासाठी हौतात्म्य आलं तरी चालेल, असा थेट इशाराच संजय राऊत यांनी दिला.
