Sanjay Shirsat : ‘तो’ VIDEO माझ्या घरचाच पण… शिरसाटांनी राऊतांच्या ‘त्या’ खळबळजनक दाव्यातील हवाच काढली

Sanjay Shirsat : ‘तो’ VIDEO माझ्या घरचाच पण… शिरसाटांनी राऊतांच्या ‘त्या’ खळबळजनक दाव्यातील हवाच काढली

| Updated on: Jul 11, 2025 | 4:09 PM

एवढे पैसे मी घरातील बॅगमध्ये कसे ठेवेन. घरात अलमाऱ्या नाहीत का? त्यांना पैशांशिवाय काहीही दिसत नाही. माझ्या बेडरूमध्ये प्रवासातून आणलेली बॅग आहे, असा दावाही शिरसाट यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संजय शिरसाटांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत शिरसाटांच्या हातात सिगारेट आणि शेजारी दोन पैशाने भरलेल्या बॅगा दिसत आहे. या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून शिरसाट यांच्याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. त्यात हे मंत्री महोदय पैशांची बंडलं भरलेली बॅग बाजूला घेऊन बसलेत असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. मात्र यासंदर्भात सवाल केला असताना संजय शिरसाटांनी राऊतांच्या दाव्यातील हवाच काढून टाकली.

शिरसाट म्हणाले, तो व्हिडीओ पाहिला. व्हिडीओत माझंच घर ती माझी बेडरुम आहे. मी बनियनवर बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मी कुठूनतरी प्रवास करून आलो आहे. मी कपडे काढले आहेत आणि मी बेडवर बसलो आहे. तर व्हिडीओमधील बॅगमध्ये पैसेच नाहीत, माझी बॅग ही कपड्यांनी भरलेली आहे, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

Published on: Jul 11, 2025 04:09 PM