निर्लज्ज राज्यपाल म्हणून कोश्यारी यांची नोंद; राऊत यांची टीका, आता नार्वेकर हे कारण?

| Updated on: May 14, 2023 | 11:44 AM

16 अपात्र आमदारांच्या बाबत नार्वेकर वेळकाढूपणा करतील मात्र त्यांना लवकरात लवकर निर्णय द्यावे लागेल. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. तरीही त्यांना निर्णय द्यावा लागेल, असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांना बदमाश राज्यपाल, लफंगा राज्यपाल म्हटलं.

Follow us on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. 16 अपात्र आमदारांच्या बाबत नार्वेकर वेळकाढूपणा करतील मात्र त्यांना लवकरात लवकर निर्णय द्यावे लागेल. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. तरीही त्यांना निर्णय द्यावा लागेल, असं ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांना बदमाश राज्यपाल, लफंगा राज्यपाल म्हटलं. तर त्यांनीच काँग्रेसचे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ दिली नाही. कारण त्यांना दिल्लीचे आदेश होते. कारण मोठं राजकारण करायचं होतं. आता अशी व्यक्ती बसवली ज्याला लोकशाहीची चाड नाही, पक्षांतराविषयी राग नाही, पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसवलं आहे. पण इतिहासात तुमची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात होईल. तुम्हाला रस्त्यावर फिरणे मुश्किल राहील, असा इशारा देतानाच आज राय्पालांची काय अब्रु राहिली आहे? निर्लज्ज राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होत आहे.