Sanjay Raut : आमच्या हाती काय बंदुका देणार आहात? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल

Sanjay Raut : आमच्या हाती काय बंदुका देणार आहात? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल

| Updated on: May 06, 2025 | 11:09 AM

'भारतात जनता तितकी अज्ञानी नाही. आम्हाला १९७१ आणि कारगिल युद्धाचा अनुभव आहे. भारत-पाक युद्ध झालं त्यापेक्षा कोरोनाचं युद्ध आपण लढलो. भारताची जनता मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग आहे.', असं संजय राऊत म्हणाले.

गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना सुरक्षेसंदर्भात आता मॉक ड्रिल करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर उद्या 7 मे रोजी संरक्षण सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे हे निर्देश देण्यात आलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचे ही आदेश आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.  दरम्यान, उद्या होणाऱ्या देशव्यापी मॉक ड्रिल्सबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

उद्या होणाऱ्या देशव्यापी मॉक ड्रिलला म्हणजे युद्ध सराव आम्ही तयार आहोत. मॉक ड्रिल अनेक देशात होतात. विशेषतः ज्या देशांना युद्धाची भिती असते. कारण तिथे ३६५ दिवस युद्धजन्य परिस्थिती असते. १९७१ साली दळणवळणाचे, संपर्काचे कोणतेही साधन नव्हते, परंतु आज तुम्ही लोकांना काय करावे आणि काय करू नये हे सांगू शकतात. विविध माध्यमातून पण जशा थाळ्या वाजल्या तसे युद्ध सरावात काही दिवस घालवतील. पण भारतीय सैन्य कायम युद्धासाठी सज्ज आहे, उद्या भोंगे वाजतील, काळोख होईल… आम्हाला काय बंदुका देणार आहात का? असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला.

Published on: May 06, 2025 11:09 AM