Shivraj Divte : शिवराज दिवटे प्रकरणाला नवं वळण; आधी समाधान मुंडेला झाली होती मारहाण

Shivraj Divte : शिवराज दिवटे प्रकरणाला नवं वळण; आधी समाधान मुंडेला झाली होती मारहाण

| Updated on: May 20, 2025 | 4:39 PM

Shivraj Divte Assault Case : बीडच्या परळीत शिवराज दिवटेला झालेल्या मारहाण प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे. मारहाण करणाऱ्या समाधान मुंडे यालाच आधी मारहाण झाली होती.

बीडच्या शिवराज दिवटे प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलेला आहे. या प्रकरणात दिवटे याला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडे यालाच आधी मारहाण झाली होती. त्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला. त्यानंतर समाधान मुंडेच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंडे याला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठीच शिवराज दिवटे याला मारहाण करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

या संपूर्ण प्रकरणावर समाधान मुंडेच्या आईने टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना छाया मुंडे म्हणाल्या की, ‘माझ्या मुलाला मारहाण झाली त्यावेळी सगळे मोठे माणसं होते. त्यांनी अत्यंत अमानुषपणे माझ्या मुलाला मारलं आहे. त्याचा राग धरून माझ्यामुलाने शिवराज दिवटे याला मारहाण केली. तो चुकला, हे मी मान्य करते. त्याने मारहाण झाली तेव्हा पोलिसात गुन्हा दाखल करायला हवा होता. तसं न करताच त्याने दिवटेला उचललं. मात्र दिवटेला मारहाण करणारे हे सगळे लहान मुलं आहेत. मोठं कोणीही नाही. तरीही जर समाधानवर गुन्हा दाखल झाला आहे, तर मग समाधानला मारणाऱ्यांवर देखील आता कारवाई व्हायला हवी, माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे’, असं छाया मुंडे यांनी म्हंटलं आहे.

Published on: May 20, 2025 04:38 PM