अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाच्या सूचना, पाहा…

अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाच्या सूचना, पाहा…

| Edited By: | Updated on: Mar 07, 2023 | 1:48 PM

राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसंच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देशही दिले आहेत

मुंबई : कालपासून राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं नुकसान झालंय. या नुकसानीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेताचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेतला आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Published on: Mar 07, 2023 01:48 PM