Shivsena News : मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनं फाडला
Thackeray Vs Shinde : मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनं फाडला आहे.
आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. हा वर्धापन दिन शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी जोरदार बॅनरबाजी देखील सुरू केलेली आहे. अशातच वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेला बॅनर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडला असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यकर्त्याने बॅनर फडल्याचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. जाणीवपूर्वक उक्सवण्यासाठी हा बॅनर शिंदे गटाने येथे लावल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला आहे.
दरम्यान शिंदे गटाचा बॅनर फाडणा-या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे नाव शिवाजी झोरे असे आहे. सदर घटनेनंतर तणाव वाढू नये यासाठी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी लगेच दुसरा बॅनर लावण्यात आला आहे.
