अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, दीपक केसरकरांचं नितेश राणेना प्रत्युत्तर

| Updated on: Jul 31, 2021 | 5:56 PM

आम्ही कुणाला चिडवत नाही. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. परंतु कोण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यांनी जे बोलले ते तपासून पहावं व शब्द मागे घ्यावेत हा वाद इथेच मिटेल असं प्रत्युत्तर केसरकर यांनी दिलं आहे.

Follow us on
अनिल देशमुख व्हायचं नसेल तर दीपक केसकरांनी विचार करुन बोलावं असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. दीपक केसरकरांनी दुसरं नाना पटोले बनू नये असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे यांनी दीपक केसरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. सावंतवाडीत खेळणी घोटाळा, गोव्यात केसरकरांनी विकत घेतलेल्या जमीनीची माहिती घेऊन ईडीकडे तपासाची मागणी करनार असून  केसरकरांना दुसरा अनिल देशमुख बनायचं नसेल तर त्यांनी विचार करून बोलावं असा सल्ला नितेश राणे यांनी दिला आहे.

दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर

फालतू धमक्या मला ऐकूण घेण्याची सवय नाही. नितेश राणेंनी बोलताना विचार करून बोलावं नाहीतर आपलं वक्तव्य मागे घ्यावं नाहीतर राजकीय संघर्ष अटळ आहे. या अगोदर नारायण राणे यांच्या सोबतचा राजकीय संघर्ष मी सूरु केला नव्हता तो राणेंनी सुरू केला त्यामुळे नितेश राणेंनी स्वतः खाजवून खरूज काढू नये. सावंतवाडी संस्थानची परंपरा आहे ती आम्ही कुणाला चिडवत नाही. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. परंतु कोण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यांनी जे बोलले ते तपासून पहावं व शब्द मागे घ्यावेत हा वाद इथेच मिटेल असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं आहे.