Gulab Patil | किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोणताही ऊठसूट आरोप करु नये : गुलाबराव पाटील

Gulab Patil | किरीट सोमय्यांनी बोलताना भान ठेवावं, कोणताही ऊठसूट आरोप करु नये : गुलाबराव पाटील

| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 7:51 PM

सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. आली की टाकली पुडी… आली की टाकली पुडी… कोरोना काय कमाईचं साधन आहे का? असा सवाल पाटील यांनी केलाय. 

जळगाव : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी येत्या 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा (Covid Center Scam) बाहेर काढणार असा इशारा दिला आहे. तसंच सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका करत, घोटाळा उघड करण्याचा इशारा दिलाय. तर सोमय्या यांच्या या इशाऱ्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सरकारवर आरोप करण्यासाठी जो तो खिशात कोरोना घेऊन फिरतोय. आली की टाकली पुडी… आली की टाकली पुडी… कोरोना काय कमाईचं साधन आहे का? असा सवाल पाटील यांनी केलाय.