कोकणात एकमेव आमदार नाराज? भास्कर जाधवांवरून रामदास कदमांचा थेट ठाकरेंना इशारा, ‘एक दिवस तुम्हाला…’

कोकणात एकमेव आमदार नाराज? भास्कर जाधवांवरून रामदास कदमांचा थेट ठाकरेंना इशारा, ‘एक दिवस तुम्हाला…’

| Updated on: Feb 17, 2025 | 11:01 AM

राजन साळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरून रामदास कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठ वक्तव्य केले. तर जाधव यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.

कधी काळी कोकणावर अधिराज्य गाजवणाऱ्या ठाकरे यांच्या शिवसेनेचा सध्याचा एकमेव शिलेदारही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. माजी आमदार राजन साळवींनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी आपल्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही असे वक्तव्य केले. त्यावरून मंत्री उदय सामंतांनी जाधवांना थेट सोबत येण्याची ऑफरच दिली. तर संजय राऊतांनी जाधवांच्या ठाकरे गटाच्या बैठकीतील अनुपस्थितीवर स्पष्टीकरण दिले. कोकणात भास्कर जाधव हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. दरम्यान राजन साळवींचा शिंदे गटातील प्रवेश आणि भास्कर जाधव यांच भूवया उंचावणारे वक्तव्य त्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुढील काळात उद्धव ठाकरे सोबत एकही आमदार शिल्लक राहणार नाही. मातोश्रीवर फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबच शिल्लक राहील असा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे. दरम्यान भास्कर जाधव यांनी आपल्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कुठल्याही पदासाठी आपण तत्वाला काळीमा फासणे शक्य नसल्याचे जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधव यांच्या रूपात कोकणात ठाकरे यांचा सध्या एकमेव आमदार आहे. उर्वरित कोकणात महायुती आणि खास करून शिंदे यांच्या शिवसेनेच वर्चस्व आहे. अशावेळी भास्कर जाधवांची भूवया उंचावणारी वक्तव्य आणि शिंदे यांच्या नेत्यांचे दावे यामुळे कोकणात ठाकरेंवर अस्तित्वासाठीच्या लढाईची वेळ आली आहे हे नाकारून चालणार नाही.

Published on: Feb 17, 2025 11:00 AM