Sanjay Raut | भाजपला देशभरात असं वातावरण निर्माण करायचंय : संजय राऊत

| Updated on: Nov 12, 2021 | 9:19 PM

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन ते काय साध्य करणार? त्रिपुरातील परिस्थितीची आम्हालाही चिंता आहे. विशेषत: ईश्यानेकडील सीमेवर जी राज्य आहेत तिथे शांतता राहावी, तिथे कुठल्याही कारणामुळे अस्थिरता नांदू नये, ही आमची भूमिका कायम असल्याचं संजय राऊत म्हणाले.

Follow us on

YouTube video player

औरंगाबाद : त्रिपुरातील कथित घटेनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी जमाव हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. या तिन्ही शहरात मुस्लिम मोर्चावेळी दगडफेक करण्यात आली. अनेक चारचाकी वाहनं, दुचाकींची मोडतोड करण्यात आली. काही ठिकाणी दुकानंही फोडण्यात आली. या हिंसाचाराचा निषेध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. त्याचवेळी राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्रिपुरातील अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचं, दगडफेक करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात सर्व समाज, धर्म, जातींबद्दल सद्भावना असणारं सरकार आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन ते काय साध्य करणार? त्रिपुरातील परिस्थितीची आम्हालाही चिंता आहे. विशेषत: ईश्यानेकडील सीमेवर जी राज्य आहेत तिथे शांतता राहावी, तिथे कुठल्याही कारणामुळे अस्थिरता नांदू नये, ही आमची भूमिका कायम असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर त्रिपुरातील ठिगण्या महाराष्ट्रात उमटू नयेत. भाजपला देशभरात अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण करुन 2024 च्या निवडणुकीत उतरायचं आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केलाय.