Sanjay Shirsat यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा; म्हणाले, ‘तुम्ही तर खुनी आहात’

Sanjay Shirsat यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा; म्हणाले, ‘तुम्ही तर खुनी आहात’

| Updated on: Sep 06, 2023 | 9:10 AM

VIDEO | जळगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेत असणाऱ्यांवर केला हल्लाबोल, शरद पवार यांनी केलेल्या त्या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांचा पलटवार

मुंबई, ६ सप्टेंबर २०२३ |मतदान करताना पाठीवर पडलेल्या लाठ्या लक्षात ठेवा, गेल्या ९ वर्षांत ज्यांनी काही केलं नाही आता तुम्हाला लाठ्या मारताय’, अशी टीका जळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेत असणाऱ्यांवर केल्याचे पाहिला मिळाले. शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. ‘आदिवासी लोकांवर गोळीबार करताना सूचलं नाही का?’, असा सवाल संजय शिरसाट यांनी शरद पवार यांना केला आहे. इतकंच नाही तर आंदोलनामध्ये पेट्रोल टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही संजय शिरसाट यांनी केली. संजय शिरसाट म्हणाले, ‘आदिवासी लोकांवर गोळीबार करताना सूचलं नाही का? तुम्ही प्राण घेतलेले आहेत तुम्ही खुनी आहात’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Published on: Sep 06, 2023 09:10 AM