Bhavna Gawli | शिवसेनेला भाजप टार्गेट करत असून, EDची नोटीस न येताच चौकशी केली जाते : भावना गवळी

Bhavna Gawli | शिवसेनेला भाजप टार्गेट करत असून, EDची नोटीस न येताच चौकशी केली जाते : भावना गवळी

| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 9:44 PM

भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याला ईडीची नोटीस आलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

वाशिम: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावरून गवळी यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याला ईडीची नोटीस आलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. खासदार भावना गवळी यांनी टीव्ही9 ला पहिली प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकाची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर ईडी होत असेल तर अनेकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला.