…तर मी राजरारण सोडेन, अन्यथा ‘त्या’ दलालाला चपलेने मारेन!- संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज शिवसेना भवनात (shivsena bhavan) जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. हा जो कुणी आहे दलाल, ज्याला भडवा म्हणतात मराठीत. त्या मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवल्याचा आरोप केलाय. ही बेनामी प्रॉपर्टी आहे असं दावा […]
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज शिवसेना भवनात (shivsena bhavan) जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. हा जो कुणी आहे दलाल, ज्याला भडवा म्हणतात मराठीत. त्या मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवल्याचा आरोप केलाय. ही बेनामी प्रॉपर्टी आहे असं दावा त्यांनी केला आहे. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे.. कधीही सांगा आपण चार बस करु आणि आपण त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले तिथं दिसले, तर मी राजकारण सोडेन. आणि नाही दिसले, तर त्या दलालाला जोड्यानं मारा.. म्हणजे दिशाभूल करायची बंद करतील, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला.
