सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटीचं कार्पेट टाकलेलं!- संजय राऊत

सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटीचं कार्पेट टाकलेलं!- संजय राऊत

| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 5:53 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मोहित कंबोज यांच्यावर वैयक्तिक आरोप केले. माझ्या मुलीच्या लग्नात ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांच्याकडे अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी केली. फुलवाला, केटरिंगवाला, डेकोरेशनवाला आणि आता तर मेहंदीवाल्याकडे चौकशी […]

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मोहित कंबोज यांच्यावर वैयक्तिक आरोप केले. माझ्या मुलीच्या लग्नात ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांच्याकडे अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी केली. फुलवाला, केटरिंगवाला, डेकोरेशनवाला आणि आता तर मेहंदीवाल्याकडे चौकशी केल्याचं मला समजलं. त्यांच्या सरकारच्या काळातही तत्कालीन वन मंत्र्यांच्या घरातील लग्नात फॉरेस्ट उभारण्यात आलं होतं. साडे नऊ कोटीचं कार्पेट टाकण्यात आलं होत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या आरोपाला आता स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.