Sanjay Shirsat : पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

Sanjay Shirsat : पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

| Updated on: Mar 14, 2025 | 4:02 PM

Sanjay Shirsat On Sanjay Raut : शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आज उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पक्ष बुडाला तरी चालेल अशी राऊतांची भूमिका असल्याचं शिरसाट यांनी म्हंटलं.

शिव्या खाण्याची चिकाटी असलेल्या संजय राऊत यांना सलाम असं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी आज जोरदार निशाणा साधला. पक्ष बुडाला तरी चालेल अशी संजय राऊत यांची भूमिका असल्याचं देखील शिरसाट यांनी यावेळी म्हंटलं.

संजय शिरसाट यांनी आज खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं. यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पक्ष बुडाला तरी चालेल, संजय राऊत हलता कामा नये या आविर्भावात ते बोलतात. ते उबाठाचे प्रवक्ते आहेत. शिव्या खाण्याची चिकाटी त्यांच्यात आहे, त्या चिकाटीला सलाम आहे. पक्ष समुद्रात नेऊन डुबवायची वेळ आली तरी ते मागे पुढे पाहणार नाही. राऊत संपूर्ण मविआचे प्रवक्ते व्हावेत याच त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोलाही यावेळी शिरसाट यांनी लगावला आहे.

Published on: Mar 14, 2025 04:02 PM