Shivsena: आजची सुनावणी उद्यावर ढकलली, सत्ता संघर्षावर उद्या निर्णय होण्याची शक्यता

| Updated on: Aug 22, 2022 | 9:49 AM

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षांवर चालत असलेल्या या खटल्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. भांडखोरी केलेल्या 16  आमदारांवर टांगती तलवार असून या आमदारांच्या यादीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे.

Follow us on

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्यावर आज सुनावणी होणार होती मात्र कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली आहे. आज होणारी सुनावणी उद्या होणार आहे. या आधीसुद्धा दोनदा सुनावणी लांबणीवर पडली होती. याच कारणाने महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पुढे ढकलण्यात आला होता. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षांवर चालत असलेल्या या खटल्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. भांडखोरी केलेल्या 16  आमदारांवर टांगती तलवार असून या आमदारांच्या यादीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. उद्याच्या सुनावणीत काय निकाल जागती हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.