Sanjay Raut : उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, शिंदेंनी कृतज्ञता दाखवायला हवी; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, शिंदेंनी कृतज्ञता दाखवायला हवी; संजय राऊतांची टीका

| Updated on: Mar 27, 2025 | 12:05 PM

Sanjay Raut On DCM Eknath Shinde : शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंविषयी शिंदेंनी कृतज्ञता बाळगली पाहिजे, असंही यावेळी राऊत म्हणाले.

मोदी आणि शाह यांचं तुमच्यावरचं छप्पर ज्या दिवशी उडेल तर तेव्हा तुम्ही कुठे असाल? याचा विचार गुवाहाटी मंदिरात जाऊन करावा, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. राज्यकर्त्याने टीका सहन केली तर तो पुढे जातो. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जपून पावलं टाकत टीका सहन करावी, असंही यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी सर्व काही दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी कृतज्ञता दाखवायला हवी. शिंदेंनी थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मोदी आणि शाह यांचं छप्पर ज्या दिवशी उडालं, तेव्हा तुम्ही कुठे असाल याचा विचार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत जाऊन करायला हवा, असा सल्ला देखील राऊतांनी दिला.

Published on: Mar 27, 2025 12:05 PM