Shivsena UBT : वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयक आज संसदेत मांडलं जात आहे. वक्फ विधेयकाला याआधी विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सुधारित वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडलं गेलं आहे. त्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चर्चा सुरू आहे.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही मतदानापर्यंत अस्पष्टच राहणार असेल असं चित्र सध्या दिसत आहे. वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चे दरम्यान अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टपणे बोलणं टाळलं आहे. वक्फ बोर्ड विधेयक हे उद्योगपतींना जमिनी देण्यासाठी आणलं जात असल्याचं देखील सावंत यांनी म्हंटलं आहे. आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वर चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले आहे. त्यानंतर त्यावर शिवसेना उबाठा गटाची भूमिका मात्र अजूनही स्पष्ट नसल्याचं बघायला मिळालं आहे.
Published on: Apr 02, 2025 06:41 PM
