Lonavala : ईईई… लोणावळ्याचा फेमस वडापाव तुम्ही खाताय? थांबा, कारण उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचा वापर अन्…
पर्यटननगरी लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ झाल्याचा प्रकार समोर आलाय. लोणावळ्यातल्या प्रसिद्ध उपहारगृहात उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचा वापर करून वडापाव तयार केल्याचा प्रकार आढळलाय त्याचाच व्हिडीओ व्हायरल झालंय.
लोणावळ्यात पर्यटकांची नेहमीच खूप गर्दी असते. याच लोणावळ्यातील प्रसिद्ध चौधरी वडापाव दुकानात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणावळ्यामधील चौधरी वडापावच्या किचनमध्ये आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओध्ये चौधरी वडापावच्या किचनमध्ये खूप घाण असून उंदरांनी तिथं धुमाकूळ घातल्याचे दिसतंय. तसेच, खराब अन्नसामग्री साठवलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, काही सडलेले आणि उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचा वापर वडापावमध्ये झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान, दुकानात साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले होते. कामगार हातमोजे किंवा टोपी न वापरता वडापाव बनवत होते. हात धुण्याची पुरेशी सोय नव्हती. स्वयंपाकघरात झुरळे आणि उंदीर फिरत असल्याने हा प्रकार खूप धोकादायक आहे. तर संबंधित तरुणाला या दुकानाच्या किचनमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. सडलेले बटाटे, उंदराने कुरतडलेला भाजीपाला आणि अस्वच्छता आढळून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
