Pakistan Spy : ठाण्याच्या रवी वर्माबाबत मोठा गौप्यस्फोट, ATS ने काय दिली खळबळजनक माहिती

Pakistan Spy : ठाण्याच्या रवी वर्माबाबत मोठा गौप्यस्फोट, ATS ने काय दिली खळबळजनक माहिती

| Updated on: May 30, 2025 | 3:42 PM

पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्मा आणि इस्प्रीत याअकाऊंटवरून एका प्रोजेक्टसाठी युद्धनौकांची माहिती हवी आहे, अशी मागणी रवी वर्माकडे करण्यात आली होती.

ठाण्यातून एटीएसने अटक केलेल्या तरूणाबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहे. महाराष्ट्र एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली रवींद्र मुरलीधर वर्माला ठाण्यातून अटक केली आहे. रवी वर्मा याने 14 पाणबुड्या आणि युद्ध नौकांची माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचे समोर आले आहे. अटक केल्यानंतर रवी वर्माच्या तपासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

अटक करण्यात आलेला रवी वर्मा हा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो. तिथे ज्या ज्या पाणबुड्या आणि युद्ध नौकांमध्ये तो काम करायचा त्याची सर्व माहिती त्याने पाकला पुरवली. रवी वर्मा पाकिस्तानच्या दोन फेसबुक अकाऊंटच्या संपर्कात होता. पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी या दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुकची नावे आहेत. त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानने काढून घेतली. दरम्यान, नेव्हल डॉकमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याने तो ते सगळं लक्षात ठेवून ती माहिती ऑडिओ आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात उघड झालंय.

Published on: May 30, 2025 02:55 PM